Friday, July 11, 2008

नावात काय आहे?

आनघाकाकूंनी दरवाजा उघडला, पळत जाणार्या बंडूने तो मौका साधून दूरुनच आवज टाकला, " चिव्या हाय काय, चिव्या?"
आता काकू चिडल्या नस्त्यातर नवल होतं, " सरळ बोलयला येतं का? नाव माहित नाही का तुला तुझ्या मित्राचं? सरळ नाव घ्ययाला काय होताय रे प्रवीण?" आनघाकाकू कडाड्ल्या, आर्थात तो पर्यंत बंडू गल्लीच्या दूसर्या टोकाला पोहोचाला होता....

चम्याला लांबून येताना पाहून, बंडू थांबला... "ए चम्याव..., एकडे"
चम्या : काय रे?
बंडू : चिव्याचं नाव कायाय रे?
चम्या : चिव्या(!?)
बंडू : नाही... शाळेतलं... हाजेरी घेताना म्हणतात ते!
चम्या : खारकर!
बंडू : खारकर आड्नाव झाला रे! नाव....
चम्या : तुला कशाला पहिजे?
बंडू : त्याला बोलवयचे आहे खेळयला.... काल खेळ संपला त्यावेळी त्याच्यावर डाव होता...
चम्या : मग?
बंडू : त्याची आई म्हणते... सरळ नाव घेवून बोलाव... आता काय म्हणून हाक मरायची? मी चिव्या म्हणलं म्हणून त्याची आई हेऽऽ चिडली...
चम्या : आसं होय... चल.

आनघाकाकूंनी प्रवीणला नितिन बरोबर येताना पाहून कामरेवर हात ठेवले...
चम्या : काकू...(चेहार्यावर मुर्तिमन्त विनय!) चिवू आहे का?
आता मात्र आनघाकाकूंनाही हासे आवरेना... त्या आत वळून म्हणल्या, "संदीप तुझे मित्र आलेत बघ!"

शेवटी नावात काय आहे? काय?